गेली दोन -तीन दिवस झाले शालेचा पूर्ण परिसर मुलानी चकाचक करून टाकला पण ही झाली देऊळाची सफाई पण गाभारा(वर्ग) अजुन बाकि होता.....
म्हणून काल मोर्चा वर्गाकडे वळवला. महिनाभर वर्ग बंद असल्याने सर्वत्र धुळिचे साम्राज्य .......मधे झालेल्या वादळी पाउसामुळे झाडाची पाने व इतर कचरा .....
मग काय मोहिम उघडली......झाड़ने, लोटने, पुसने आदी सर्व पर्यायाचा शक्य तसा मुलांच्या मदतीने वापर केला व वर्ग एकदम टकाटक......
आता सजावट.... पताका, बोलक्या पताका, तक्ते,models, याचा कमी जास्त प्रमाणात पुरेपूर वापर करून वर्गही सजवला.....फलक लेखन केले....
अणि आज अखेर वर्ग अपटूडेट......आता देऊळासह गाभारा ही सजला.....आता वाट गाभार्यातल्या देवांची (विद्यार्थ्याची) ....आणि सोमवार 15 जून ची.......
"नवीन शैक्षणिक वर्षाच्या सर्वाना खूप खूप शुभेच्छा"......
No comments:
Post a Comment